तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. नाटकाप्रमाणे चित्रपटाच्या रूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं. प्रेक्षकांनी उचलून धरलेल्या व नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय असलेल्या 'नटसम्राट' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार २१ ऑगस्टला दुपारी १२.३० वा. व सायंकाळी ६.३० वा. झी टॅाकीजवर होणार आहे.
काही नट असे असतात जे खूप यश मिळवतात पण त्यांच्या पडत्या काळात त्यांना कुणीही विचारत नाही. जोपर्य़ंत त्याच्याकडे वैभव असतं तोपर्यंतच त्याला सगळे जवळ करतात. पण उतरत्या काळात आप्तांना त्याचं ओझं होऊ लागतं. पण हा नट मरेपर्यंत त्याचं नटपण सोडत नाही. अशाच एका नटाची कथा असलेला सिनेमा म्हणजे ‘नटसम्राट…असा नट होणे नाही’.
अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्त्र अभिनेते नाना पाटेकर, कावेरीच्या भूमिकेतील मेधा मांजरेकर तसेच सुनील बर्वे, अजित परब,नेहा पेंडसे आणि मृण्मयी देशपांडे या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी दर्जेदार पर्वणीच असणार आहे. मोठं ऎश्वर्य आणि वैभव हरवलेल्या एका नटाची शोकांतिका असलेल्या ‘नटसम्राट’ या सिनेमाचा आस्वाद प्रेक्षकांना २१ ऑगस्ट ला. दुपारी १२.३० वा. व सायंकाळी ६.३० वा. झी टॅाकीजवर घेता येईल.
Click here to read more about "Natsamrat"
Comments