आपल्या रुपेरी पडद्यावर आल्यानंतर प्रेक्षकांनी ही कलाकृतीही उचलून धरली. श्रवणीय संगीत, बहारदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाने सजलेल्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचा टॅाकीज प्रीमियर रविवार ४ सप्टेंबरला दुपारी १२ .०० वा. व सायंकाळी ७.००वा. प्रसारित होणार आहे.
दोन घराण्यातील गायकीच्या संघर्षावर कट्यार..चं कथानक आधारित आहे. आपल्या स्वर्गीय सुरांच्या जोरावर पंडितजीना राजगायक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. पंडितजींना मिळणारा हा बहुमान खॉंसाहेबांच्या मनात सलतोय आणि याच इर्षेपोटी ते कुटील डाव रचून हे पद स्वतः मिळवतात. पंडितजींवर झालेल्या या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्यांचा शिष्य सदाशिव पुढे येतो आणि मग सुरू होतो सदाशिव आणि खाँसाहेबांमधला संघर्ष.
कट्यार काळजात घुसली चित्रपट अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री,साक्षी तन्वर यांच्या भूमिका आहेत.
प्रसारण - झी टॅाकीज रविवार ४ सप्टेंबर दुपारी १२ .०० वा. व सायंकाळी ७.००वा.
Click here to read more about "Katyar Kaljat Ghusali"
Comments