ZTCA Dubsmash Contest


मराठीतील पहिलं #DubsmashContest फक्त आपल्या झी टॉकीज वर!

झी टॉकीजने आयोजित केलेल्या #DubsmashContest ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आपल्या या कॉन्टेस्ट मार्फत झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांपर्यंत सहज पोहचून त्यांना आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी देत आहे. झी टॉकीजच्या Dubsmash साऊंडबोर्डवर असलेल्या audio clips मधून प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांचे डायलॉग्स, गाणी डब करुन कलात्मक रित्या ती सादर करु शकतात. यातील सर्वोत्कृष्ट निवडक Dubsmash विडीओ झी टॉकीज वाहिनीवर दाखवण्यात येणार आहेत.

दोन आठवड्यांमध्येच या कॉन्टेस्ट ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आत्ता पर्यंत एकूण 800 विडीओ या कॉन्टेस्ट अंतर्गत आले आहेत. त्यापैकी पहिल्या आठवड्यात ६३ तर दुस-या आठवड्यात ६२ विजेते घोषित केले गेले आहेत. या सर्व विजेत्यांनी अनुक्रमे १०००, ५०० आणि १०० रुपये किंमतीचे PayTm रिचार्ज वाऊचर्स जिंकली आहेत.

प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता झी टॉकीजने आपल्या #DubsmashContest चा अवधी अजून 2 आठवड्यांनी वाढवला असून, प्रेक्षकांना या संधीचा उत्तम लाभ होईल यात शंका नाही.

त्यातील ४ निवडक विजेत्यांच्या प्रतिक्रीया :झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स च्या निमित्ताने झी टॉकीज घेऊन आली आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार प्रेक्षक बनण्याची धमाल संधी. झी टॉकीजच्या #DubsmashContest मध्ये सहभागी होणा-या भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे संधी झी टॉकीज वर झळकण्याची. या शिवाय दर आठवड्याला जिंकता येणार आहेत एकूण १ लाख रुपये किंमतीचे फ्री रिचार्ज वाउचर्स.

या #DubsmashContest मध्ये सहभागी होऊन आपले #Dubsmash विडीओ खालील पद्धतीने झी टॉकीज सोबत शेअर करता येतील:

  1. #‎Dubsmash‬‬ वर 'Zeetalkies' शोधा.
  2. 'Zeetalkies' sound board वर आपले आवडते डायलॉग्स निवडा.
  3. आपले #Dubsmash विडीओ तयार करा
  4. आम्हाला पाठवा 9820502782 या WhatsApp क्रमांकावर.

Click here to read Terms & Conditions of the ZTCA Dubsmash Contest.