‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस’ सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी हटके कलाविष्कारांची मेजवानी असते. यंदाच्या सोहळ्यातही एक सो बढकर एक कलाविष्कार सादर झाले. यावर्षी ‘कल आज और कल’ अशी हटके थीम घेऊन हा सोहळा रंगला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगलेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’ सोहळ्याची ही रंगत रविवार २४ जुलै सायंकाळी ७ वाजता झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे.
उर्मिला कानिटकर हिच्या गणेश वंदनेने या पुरस्कार सोहळ्याची धमाकेदार सुरुवात झाली. ‘कल आज और कल’ या थीम नुसार जुन्या व नव्या गीतांवर मानसी नाईक, वैभव तत्ववादी , पूजा सावंत यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मानसी नाईकचा ग्लॅम डान्स या सोहळ्यातील खास आकर्षण ठरला. सागर कारंडे, प्रियदर्शन जाधव, भूषण कडू, कुशल बद्रिके, विनीत भोंडे, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, रमेश वाणी यांच्या ‘सैराट २’ प्रहसनाने सोहळ्यात चांगलीच रंगत आणली. संतोष पवार, विशाखा सुभेदार, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, विनीत भोंडे यांनी सादर केलेलं बाजीराव – मस्तानी या प्रहसनाने हास्याचा बार उडवून दिला. अतुल तोडणकर, संतोष पवार, श्रेया बुगडे, अभिजीत केळकर, नम्रता आवटे, रमेश वाणी या कलाकारांनी सादर केलेली ‘सात्विक बरं’ही नाटिका ही भन्नाट होती. या शिवाय सर्वात धमाल आणली ती भाऊ कदम यांच्या ‘मेहमूदच्या’ स्कीटने व मेहमूदच्या विवध गाण्यांवर भाऊ कदम, विशाखा सुभेदार, विघ्नेश जोशी, अभिजीत केळकर, समीर चौघुले यांनी धरलेल्या ठेक्याने. समीर चौघुले, विघ्नेश जोशी, सागर कारंडे, भूषण कडू, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, प्रियदर्शन जाधव, यांनी सादर केलेलं
‘नाटकबंदी’ यांचं प्रहसन ही चांगलच वाजलं.
मोहन जोशी, पुष्कर क्षोत्री, क्रांती रेडकर, प्रथमेश परब यांचं धम्माल निवेदन, प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, मंचावर सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कारांनी ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस’ ची रंगत चांगलीच वाढवली. मनोरंजन क्षेत्रातील विनोदी कलावंताच्या कार्याची दखल घेणारा हा शानदार सोहळा येत्या २४ जुलैला सायंकाळी ७.०० वा. झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.

Comments