सध्या देशात दोनच गोष्टी जोरात चालू आहेत, एकीकडे आयपीएलमध्ये विराट आणि थिएटरमध्ये सैराट!
हा फक्त एक विनोद नसून हे जळजळीत सत्य आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सारे विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनच्या अगोदरपासून महाराष्ट्रभर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण निर्माण झाली होती. रसिकांनी चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. परश्या आणि आर्चीची प्रेमकथा महाराष्ट्राला खूप भावली. बॉक्स ऑफिसलाही चांगलीच झिंग चढवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. आत्तापर्यंत ११ दिवसात चित्रपटाने तब्बल ४१ कोटींचा गल्ला जमवला आहे. मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून सैराटने नवी ओळख मिळवली आहे.
याआधी, नटसम्राट या नाना पाटेकर अभिनित लोकप्रिय चित्रपटाने ४० कोटींचा पल्ला गाठला होता. नटसम्राटला मागे टाकून 'सैराट' सुसाट कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर खऱ्याअर्थाने सम्राट ठरला आहे. सिनेजाणकारांच्या मते सैराट ५० कोटींचा टप्पा गाठू शकेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नागराज मंजुळे आणि संपूर्ण सैराट टीम सध्या 'ट्रेंडिंग' आहे. चित्रपटाचे संवाद, गाणी तुफान गाजत आहेत. अजय-अतुलच्या संगीताची झिंग महाराष्ट्र अनुभवत आहे. चित्रपटाला पायरसीचे ग्रहण लागूनही चित्रपटाने इतके घवघवीत यश संपादन केले आहे, याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा घेतली.
सैराट मराठी चित्रपटसृष्टीतील माइलस्टोन ठरला आहे. परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा सैराट पाहून गहिवरला, ट्विटरच्या माध्यमातून आमिरने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सैराटची ही उल्लेखनीय भरारी मराठी सिनेमासाठी निश्चितच लाभदायक आहे, यात शंकाच नाही. जगाच्या पाठीवर आपल्या आशयघन विषयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेमाला सैराटने वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. बॉक्स ऑफिसवर मराठीचा झेंडा उंचावणाऱ्या सैराटच्या संपूर्ण टीमचे झी टॉकीजतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!

Click here to read more about "Sairat"
Comments