गेल्या ५-६ वर्षांच्या कालावधीत मराठी सिनेसृष्टीत लक्षणीय बदल झाले आहेत. आशयघन विषयांसाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सातत्याने आपली ठसठशीत मोहोर उमटवली आहे. मराठी चित्रपटांची ही 'अर्थ'पूर्ण भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडले आहे. आत्तापर्यंत दोन आठवड्यात चित्रपटाने जवळपास ५५ कोटींची बक्कळ कमाई केली आहे. एक नजर टाकूया, मराठीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या ५ सिनेमांवर -
टाइमपास २ - रवि जाधव यांच्या 'टाइमपास' सिनेमाने आबालवृद्धांना वेड लावले होते, याच सुपरहिट टाइमपासचा सिक्वेल बनवून रवि जाधवांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला एक नवे वळण दिले. दगडू आणि प्राजक्ताची एपिक लव्हस्टोरी याच भागात पूर्ण झाली. प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांची केमिस्ट्री रसिकांना खूप भावली आणि या धमाल मसालापटाने बघता बघता बॉक्सऑफिसवर ३५ कोटीची कमाई केली.
लय भारी - रितेश विलासराव देशमुख यांच्या पहिल्याच मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नावाप्रमाणेच 'लय भारी' गल्ला जमवला. रितेशचे मराठी पदार्पण बघण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच गर्दी केली. अजय-अतुलचे संगीत, रितेशचा चाबूक अभिनय, निशिकांत कामत यांचे कल्पक दिग्दर्शन, मसालेदार संवाद या बळावर लय भारीने मराठी चित्रपटसृष्टीत यशाचा मापदंड प्रस्थापित केला.
कट्यार काळजात घुसली - 'संगीत कट्यार काळजात घुसली' या अजरामर नाटकाचे सुबोध आणि टीमने केलेले सिनेमा माध्यमांतर खूप उत्तम जमून आले. संगीत हा या चित्रपटाचा नायक होता. संगीतप्रेमींच्यासोबतच सामान्य सिनेरसिकांनी 'कट्यार...' अक्षरशः डोक्यावर घेतला. बॉक्स ऑफिसवर जवळपास ४० कोटी कमवून कट्यारने नवा इतिहास रचला.
नटसम्राट - दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'नटसम्राट' या अजरामर नाट्यकृतीचे माध्यमांतर केले. नाना पाटेकर सारख्या दिग्गज कलाकाराने प्रमुख भूमिकेचे शिवधनुष्य पेलले आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय रचला. नानांचा 'नटसम्राट' पाहण्यासाठी लोकांनी सिनेमागृहात धाव घेतली. आपल्या लाजवाब अभिनयाने नानांनी मराठी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नटसम्राटने बॉक्स ऑफिसवर ४० कोटींचा पल्ला पार केला.
सैराट - नागराज मंजुळे यांच्या सैराटने तर महाराष्ट्राला वेड लावलं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीपासूनच सिनेमाची जोरदार चर्चा सुरु होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेरसिकांच्यासह बॉक्सऑफिससुद्धा सैराटमय झाले. आत्तापर्यंत दोन आठवड्यात चित्रपटाने जवळपास ५५ कोटींची बक्कळ कमाई केली आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही सिनेमाने इतकी मजल मारली आहे.

Click here to read more about "Sairat"
Comments