महाराष्ट्राची नस अचूक ओळखणाऱ्या 'झी टॉकीज'ने कलात्मकता आणि व्यावसायिकतेची योग्य सांगड घालत आजवर अनेक उपक्रमांनी रसिकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. ‘लाईट हाऊस’ हा असाच एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन 'झी टॉकीज' आता लघुपटांसाठी एक नव दालन खुलं करणार आहे. जगभरात तयार होणाऱ्या उत्तम लघुपटांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी एखाद्या वाहिनीने पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘लाईट हाऊस’ या नावाची सुद्धा एक खासियत आहे. टॅलेंट असूनही प्रकाशात नसलेल्या कलाकर्मींना प्रकाशात आणणार व्यासपीठ म्हणून या उपक्रमाचं नाव ‘लाईट हाऊस’ असं ठेवण्यात आलं आहे. १० जानेवारीपासून झी टॉकीजवर सुरु होणार आहे प्रवास गोष्टींचा, 'लाईट हाऊस’ दर शनिवारी रात्री ९ वाजता आणि पुनःप्रक्षेपण रविवारी सकाळी १० वाजता!
Read More