Maharashtracha Favorite Kon 2017


प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणा-या कलाकारांचा आणि तंत्रज्ञाचा गौरव करणारा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार सोहळा. वर्षाकाठी येणा-या विविध मराठी चित्रपटांपैकी आपल्या पसंतीचे चित्रपट, कलाकार निवडण्याची संधी प्रेक्षकांना देणारा हा सन्मान सोहळा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. रसिक प्रेक्षकांना आपल्या मतांचा कौल देता यावा या हेतूने झी टॉकीज महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा आगळा-वेगळा सन्मान सोहळा गेल्या आठ वर्षापासून आयोजित होत असून यंदा सोहळ्याचे नववा वर्ष आहे.