वेगवेगळे विषय हाताळून प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न नेहमीच झी टॅाकीजतर्फे करण्यात येतो. . प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेत नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची व स्पर्धांची मेजवानी सातत्याने प्रेक्षकांना देणाऱ्या झी टॅाकीजने देवाचा ठेवा ही अनोखी स्पर्धा टॅाकीजच्या प्रेक्षकांसाठी आणली आहे. सोमवार २४ एप्रिलपासून या स्पर्धेला  सुरुवात होणार आहे.

२४ एप्रिल ते ३१ मे या दरम्यान दररोज दुपारी १२.०० वा. ते रात्री १०.०० वाजेपर्यंत चित्रपटाच्या  ब्रेकदरम्यान या स्पर्धेसाठीचे १० प्रश्न आपल्या आवडत्या कलाकारांमार्फत विचारण्यात येतील. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन पर्याय देण्यात येतील. या प्रश्नांची अचूक उत्तरं देण्यासाठी टॅाकीजच्या स्क्रीनवर दाखवण्यात  येणाऱ्या मोबाईल क्रमांकावर मिसकॉंल्ड देत प्रेक्षकांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरं द्यायचं आहे. दररोज वीस विजेते घोषित करण्यात येतील.  या विजेत्यांना  देवाच्या  मानाच्या महावस्त्रांचा ठेवा बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. अचूक उत्तरं देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांची निवड झी एन्टरटेनमेन्ट इटंरप्राइजेस लिमिटेड तर्फे करण्यात येणार आहे.

दगडू शेठ हलवाई व सिद्धिविनायका चं उपरण, अंबाबाईची साडी, ज्योतिबाचा अंगरखा,  स्वामी समर्थ व पांडुरंगाची शाल तसेच शंकराच महावस्त्र हा ठेवा प्रेक्षकांना बक्षिसाअंतर्गत मिळणार आहे. विजेत्यांना हा ठेवा घरपोच पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल. असेल तुमच्याकडे देवाचा ठेवा तर सगळ्या जगाला वाटेल तुमचा हेवा असं म्हणतं झी टॅाकीजवर येणाऱ्या देवाचा ठेवा या अनोख्या स्पर्धेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील.Celebs SpeakView Allचित्रपट समीक्षण संपूर्ण पहा