Madhu Ithe An Chandra Titheदोन परस्परविरोधी कुटुंबांची, प्रेमात वेड्या झालेल्या दोन खट्याळ प्रेमिकांची एक भन्नाट कॉमेडी लव स्टोरी म्हणजेच मधु इथे अन चंद्र तिथे.
कोल्हापूरचे जमीनदार अप्पा कोळसे पाटील आणि पुण्याचे प्रख्यात गायक, श्रीमंत कारखानदार भीमसेन कारखानीस ह्यांची मुलं, मधु आणि चंद्रकांत एकाच कॉलेजात शिकत असताना एकमेकाच्या प्रेमात पडतात आणि सुरुवात होते एका धमाल लव स्टोरीची!

कॉलेज संपवून घरी आल्यानंतर दोघाही आपापल्या पालकांना आपल्या प्रेमाबद्दल सांगतात, विरोध होतो, कारण पुणे आणि कोल्हापूरमध्ये असलेलं विचारांचं आणि वागण्या बोलण्याच्या पद्धतींमधलं जमीन अस्मानाच अंतर पण, मुलांच्या हट्टापायी घरच्यांना ऐकावंच लागतं. सगळं सुरळीत चाललं आहे असं वाटत असतानाच मधु आणि चंद्रकांतच्या लव स्टोरी मध्ये एक भन्नाट ट्विस्ट येतो आणि ह्या तुफान कॉमेडीला एक नवीनच वळण येतं.

हसून हसून पोट दुखेल इतके जबराट विनोद आणि प्रसंग, मधु आणि चंद्रकांत गोड लव स्टोरी, कोळसे पाटील आणि कारखानिसांची रॉकिंग केमिस्ट्री. इरसाल माणसांची तुफान कॉमेडी आणि ह्या  दोन मॅड फॅमिलींमध्ये अडकलेली एक  क्रेझी लव स्टोरी पहा मधु इथे अन चंद्र तिथे!